Jalgaon News: चैनपुलींगच्या प्रकरणात एकाच महिन्यात ३ लाखांचा दंड

चैनपुलींगच्या प्रकरणात एकाच महिन्यात ३ लाखांचा दंड
Jalgaon Railway News
Jalgaon Railway NewsSaam tv
Published On

जळगाव : रेल्वेतील अनअधिकृत फेरीवाल्यांसाठी चैन पुलींग करणाऱ्यांकडून एकाच महिन्यात रेल्वेने (Railway) तब्बल तीन लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यासोबतच अनअधिकृत दलालांकडून (Bhusawal) अवैध तिकीटावर प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon Railway News
Jalgaon News: तापी नदीत उडी मारत वीटभट्टी मजुराने संपविले जीवन

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने मे महिन्यात भुसावळ विभागात फुकटे प्रवासी, बोगस तिकीटावरील प्रवासी, अनअधिकृत वेंडरर्स, मद्य व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. गुन्हे दाखल करून भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये अनधिकृत अलार्म चैन ओढण्याची ९४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. ७११ व्यक्तींना अटक करण्यात आली आणि २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Jalgaon Railway News
Shahada News: प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला; बीडीओ विरोधात नागरीकांचा मोर्चा

बोगस तिकीटावर प्रवास

भारतीय रेल्वे (Central Railway) कायद्याच्या कलम १४३ अन्वये, बेकायदेशीर बोगस तिकटांवर प्रवास करण्याची ४९ प्रकरणे नोंद झाली. ५२ दलालांवर कारवाई करण्यात आली. कायद्याच्या कलम १४४ (१) अंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांची २,७४१ प्रकरणे नोंदविण्यात आली. २,७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून १७ लाख २७ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com