Aditya Thackeray On Shinde: 'बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही', शिंदेवर निशाणा साधत आदित्य ठाकरे काय म्हणाले? जाणून घ्या

Aditya Thackeray On Shinde: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची मुंबईतील ही दुसरी जाहीर सभा आहे. शिंदे गटाचे आमदार सरवणकरांच्या कार्यालयाबाहेर ही सभा होत आहे. गणेशोत्सवात याच परिसरात ठाकरे आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
Aditya Thackeray On Shinde
Aditya Thackeray On ShindeSaam Digital
Published On

सचिन गाड

Aditya Thackeray On Shinde

सगळ्या देशाने जनता अदालत बघितली आणी त्यांना आमची बाजू पटली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खोटा निकाल दिला आहे. त्यांनी अवमानाची कारवाई केली तरी चालेल, मी फासावर जायला तयार आहे, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी आज प्रभादेवीतील महा निष्ठा-महा न्याय सभेत व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची मुंबईतील ही दुसरी जाहीर सभा आहे. शिंदे गटाचे आमदार सरवणकरांच्या कार्यालयाबाहेर ही सभा होत आहे. गणेशोत्सवात याच परिसरात ठाकरे आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही, आमचं हिंदूत्व सर्वसमावेशक आहे. जाती पातीत धर्मा धर्मात भांडण लावणार आमचं हिंदूत्व नाही. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना यांनी सोडलं होतं. त्यांना फाशी देणार आमच सरकार आहे. महिलांबाबत अर्वाच्च वक्तव्य करणारे आज सरकारमध्ये आहेत.गणेशोत्सव दोन टपोरी गद्दारांनी बंदुक काढली शिवीगाळ केली होती.नंतर पोलीस स्थानकात गोळीबार केला. याचा बॅलेस्टिक रिपोर्ट आहे. त्याच्याच एका माणसाने हा मुद्दा काढायला लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दहशतवादी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार, असल्याचं त्यांनी सांगितलं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray On Shinde
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध होणार?, आयोगाकडून २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण

इथले आमदार दुकानदारांना ५००० साठी सतावतात. आपला घास खेचून गुजरातला दिला जातोय. वर्ल्डकपचा फायनल सामना पण गुजरातला सोडला. ३७० जसं काढलं तसं महाराष्ट्रावर अन्याय करण्यासाठी कोणतं कलम नवं आणलंय. रेस कोर्स बिल्डरांच्या घशात घालायच आहे. अंडरग्राउंड कार पार्कची काय गरज आहे. आम्ही तिथे काहीही होऊ देणार नाही. ६०८० कोटी रूपयांचा रस्ते घोटाळा आहे मात्र २८० कोटी रुपयांचा दंड कंत्राटदारांना होऊनही एकही रस्ता पूर्ण झालेला नाही.

खिचडी घोटाळ्यात ज्याची कंपनी त्याच्यावर कारवाई का नाही

देशातील लोकशाही संपवली जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. जनता त्रस्त आहे. पक्षाच्या सभेत बाथरूम लावण्यासाठी फिरत शौचालय लावण्यासाठी ६० लाखांचा खर्च केला जातो. हा पैसा पालिकेने दिला.खिचडी घोटाळ्यात ज्याची कंपनी होती त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला. गेल्या वर्षभरापासून सगळ गुजरातमध्ये जातय. ठाण्यात लूट चालू आहे. मुंबईत सॅनिटरी पॅड, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे जेवढे घोटाळे करायचे तेवढे करा पण आमच सरकार येताच तुम्ही जेल मध्ये जाणार २०२४ मध्ये आमचंच सरकार येणारच असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray On Shinde
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलिसांची 12899 पदे रिक्त, कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com