Mumbai Police Recruitment: मुंबई पोलिसांची 12899 पदे रिक्त, कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर? जाणून घ्या

Mumbai Police Recruitment: मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार मुबईत अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Police Recruitment
Mumbai Police RecruitmentSaam Digital
Published On

सूरज सावंत

Mumbai Police Recruitment

मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार मुबईत अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. त्यावर मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या ५१३०८ आहेत. यात ३८४०९ कार्यरत पदे असून १२८९९ पदे रिक्त आहेत.

सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाईची

पोलीस शिपाई पदासाठी २८९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७८२३ कार्यरत पदे असून ११११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलीस उप निरीक्षकांची ३५४३ पदे मंजूर असताना फक्त २३१८ कार्यरत पदे असून १२२५ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक १०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त असून सद्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त १२ जागांपैकी फक्त १ पद रिक्त आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Police Recruitment
Goa Crime: आईस्क्रीम आणण्यासाठी जाताना पत्नी बुडाली समुद्रात, तपासात उघड झाली भलतीच माहिती, अलिशान हॉटेलच्या मॅनेजरचा प्रताप ऐकून व्हाल थक्क

अनिल गलगली यांच्या मते मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झालेला नाही पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्ती मुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढविली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केलं आहे.

Mumbai Police Recruitment
Bacchu Kadu News: मोठी बातमी! बच्चू कडू अंतरवाली सराटीकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com