Goa Crime
Goa CrimeSaam Digital

Goa Crime: आईस्क्रीम आणण्यासाठी जाताना पत्नी बुडाली समुद्रात, तपासात उघड झाली भलतीच माहिती, अलिशान हॉटेलच्या मॅनेजरचा प्रताप ऐकून व्हाल थक्क

Goa Crime News: गोव्यातील एका आलिशान हॉटेलच्या मॅनेजरला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. दक्षिण गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Published on

Goa Crime

गोव्याच्या एका समुद्र किणाऱ्यावर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लखनौमधील दाम्पत्य कोलवा समुद्र किणाऱ्यावर फिरायला गेलं असताना अचानक पत्नी समुद्रात बुडाली. त्यानंतर पतीने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत तिचा बुडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सोस्टमार्टमसाठी पाठवला त्यानंतर जी माहिती समोर ती ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

गोव्यातील एका आलिशान हॉटेलच्या मॅनेजरला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. दक्षिण गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आ. त्याने पत्नीला समुद्रात बुडवलं होतं आणि त्यानंतर अपघाताने पत्नी समुद्रात बुडाल्याचा बनाव केला. पत्नी आईस्क्रीम आणण्यासाठी जात असताना अचानक तीचा तोड गेला आणि ती बुडाल्याचा दावा केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जवळच असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली आणि कुंकोलिम पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान पीडितेच्या पतीचे वर्तन संशयास्पद आढळले. एका स्थानिक रहिवाशाने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये, तो पाण्यातून बाहेर येताना आणि नंतर परत जाताना दिसत होता. शक्यतो ती मेली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी करण्यासाठी गेला असावा. महिलेच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे समुद्रात झटापट झाल्याचा संशय बळावला. तसेच महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीतही विसंगती होती. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

Goa Crime
Dombivli Crime: इको व्हॅन घेऊन आले अन् घरासमोरील स्कॉर्पिओ चोरून पसार झाले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

एक वर्षापूर्वीच या या दोघांचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणाने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. दरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये कुंकोलिम पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Crime
Mumbai Crime News: सोशल मीडियावरील ओळख, पबमध्ये भेटताच घात झाला; मुंबईत २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com