Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची पोलिसांकडून धिंड; VIDEO होतोय व्हायरल

Sharad Mohol Case Updates: शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची पोलिसांनी राहत्या घरापासूनच धिंड काढली.
Sharad Mohol Case Latest News
Sharad Mohol Case Latest NewsSaam TV

Sharad Mohol Case Latest News

शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (१९ जानेवारी) एक मोठी कारवाई केली. मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची पोलिसांनी राहत्या घरापासूनच धिंड काढली. शेलार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Mohol Case Latest News
Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताय? रविवारी 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक...

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लग्नाच्या वाढदिवशीच आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर भररस्त्यात गोळीबार केला होता. कोथरूडमधील (Pune News) सुतारदरामध्ये हा भयानक प्रकार घडला होता.

आपल्या मामाचा बदला घेण्यासाठी मुन्नाने मोहोळला संपवण्याचा कट रचला होता. त्याचबरोबर विठ्ठल शेलार यालाही मोहोळला संपवून गुन्हेगारी जगतात आपल्या दहशतीचे बीज रोवायचे होते. यासाठी आरोपींनी एक महिनाआधीच हत्येची प्लानिंग केली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, शरद मोहोळची भररस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली होती. हीच दहशत मिटवण्यासाठी पोलिसांनी शेलार याची भररस्त्यावरून धिंड काढल्याचं बोललं जातंय.

पोलिसांनी केवळ शेलारची धिंडच काढली नाही, तर त्याची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली आहे. आरोपीने आपली कार पूनावळेमधील त्याच्या फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.

Sharad Mohol Case Latest News
Daily Horoscope: शुक्र संक्रमणामुळे कन्यासह 5 राशी होणार धनवान, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com