Manoj Jarange News : मातोरी गावात पिता-पुत्राची भेट; मनोज जरांगेंचे वडील भावुक, म्हणाले...

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांनी म्हटलं की, लहानपणापासूनच त्याने जनतेची सेवा केली. लहानपणापासूनच या कामात तो आहे. आम्हीही कधी काही बोललो नाही, काही बोललो नाही.
Manoj Jarange News
Manoj Jarange News Saam TV
Published On

Manoj Jarange Patil :

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे आज त्यांच्या मूळ गावी मातोरी येथे पोहोचले. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांची भेट झाली. आपल्या मूळ गावी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे यांना अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी मनोज जरांगे आणि त्यांचे वडील भावुक झालेले पाहायला मिळाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांनी म्हटलं की, लहानपणापासूनच त्याने जनतेची सेवा केली. लहानपणापासूनच या कामात तो आहे. आम्हीही कधी त्याला काही बोललो नाही. जनतेचं कल्याण करावं असं आम्हाला आधीपासून वाटत होतं. आम्ही त्याला कधीच अडवलं नाही. जे करायचं ते कर आम्ही सांगितलं. यातून जनतेचं चांगलंच झालं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange News
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं; CM एकनाथ शिंदेंचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या गावात आल्यानंतर म्हटलं की, अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गाव माझं कुटुंब आहे, मात्र समाजासाठी काही करायचं होतं. जन्मभूमीविषयी प्रेमचं आहे. गावानंही मला सांभाळलं आहे. शेतीची कामं, खेळ, यात्रा सगळ्यांनी एकत्र मिळून केले आहेत. गावात सामाजिक काम करताना आम्ही एकत्र असायचो. (Latest Marathi News)

समाज म्हणजे काय याची समज आली तेव्हापासून मी यात झोकून दिलं आहे. भगव्या झेंड्यासाठी मी काम केलं. समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या ताकदीने लढा उभा केला. माझ्या मातोरी गावातूनच ही लढाई सुरु केली. मात्र काय केलं पाहिजे हे कळत नव्हतं. आंदोलनाबाबत त्यानंतर बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे आंदोलन सुरु करताना आधी मराठ्याचं आंदोलन नेमकं कुठयं हे शोधून काढलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Manoj Jarange News
Manoj Jarange: मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार

आधी आंदोलन छेडलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर या आंदोलनाला जोडला. शक्ती नाहीतर युक्तीने काम करायचं ठरवलं. आरक्षणाची धग मराठा बांधवांच्या मनात होती. त्यामुळे आरक्षणासाठीच झगडा सुरु केला. त्यामुळे आज मराठा बाधव विजयाच्या जवळ आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com