ACB officials conduct trap operation in Parli, Beed district, as Tehsildar faces bribery allegations. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात खळबळ! लाच घेताना प्रांताधिकारी शिंदे यांना बेड्या, लिपिकही जाळ्यात; नेमकं काय घडलं?

Pune ACB trap Govind Shinde bribe case : प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना २ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. महसूल विभागात खळबळ, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी

Pune SDO Govind Shinde bribery case details : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पांडुरंग शिंदे (वय ४६) यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मंचर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची एक भागीदारी फर्म आहे. या फर्ममार्फत त्यांनी पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे जमीन विकास नियमांनुसार निवासी इमारत उभारण्याचे काम सुरू केले होते. इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील आवश्यक कागदपत्रे व नोंदी पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला होता.

हे काम मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान हा व्यवहार २ लाख रुपयांवर ठरला. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून २७ मार्च २०२६ रोजी दुपारी मंचर येथील उपविभागीय कार्यालयात कारवाई केली. यावेळी तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारताना गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.

या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: सोलापूर DCC बँक मतमोजणीत आक्षेप; मतपत्रिका चुरगळल्याचा उमेदवाराचा आरोप

Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...

Stray dog attack: भटक्या कुत्र्याला पाहून धावला, पण हार्ट अटॅकने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पांढरे केस उपटून काढावे की नाही?

SCROLL FOR NEXT