PM Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro Inauguration: पुणे मेट्रोचे उद्घाटन PM मोदींच्याच हस्ते! रविवारी VIDEO कॉन्फरन्सद्वारे दाखवणार हिरवा झेंडा; 'मविआ' आक्रमक

Pune Metro Inauguration By PM Narendra Modi: पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर मविआच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्गिका सुरु करण्याचा इशारा दिला आहे. अशातच आता रविवारी (ता. २९) पंतप्रधान मोदींच्याच हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर| पुणे, ता. २७ सप्टेंबर

Pune Metro Inauguration UPdate: पावसाची धुवांधार बॅटिंग, त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला. पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचा उद्घाटन सोहळाही पार पडला नाही. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर मविआच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्गिका सुरु करण्याचा इशारा दिला आहे. अशातच आता रविवारी (ता. २९) पंतप्रधान मोदींच्याच हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे.

मेट्रो उद्घाटनाला नवा मुहूर्त..

पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रविवारी (ता. २९ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून महायुतीमधील प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुढील दोन दिवसात यासंबंधी नियोजन करुन उद्घाटन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील इतरही प्रकल्पांचे उद्घाटन , भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार आहे.

यामध्ये जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उद्घाटन, स्वारगेट - कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा येथे पहिल्या मुलींची शाळेचे भूमिपूजन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगरचे लोकार्पण तसेच सोलापूर विमानतळाचे उद्घाटनाचा यामध्ये समावेश आहे.

मविआ आक्रमक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीने हे उद्घाटन करण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो मर्गिकेचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय ही भीती पुणेकरांना सतावत आहे. जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गीका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. म्हणून आज सकाळी ११.०० वाजता या मर्गिकेचे महाविकास आघाडीच्या वतीने लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच मविआचे नेते शिवाजीनगर मुख्य मेट्रो स्थानकात आंदोलनही करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT