PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?
PM Modi Pune VisitSaam Tv

PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?

Pune Rain Update: हवामान खात्याने पुण्याला आज पावसाचा अलर्ट जारी केला आहे. या पावसाचा फटका पीएम मोदींच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सभेचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे.
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे गरज पडल्यानंतर सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. कारण पावसामुळे पर्यायी स्थळावर मोदींच्या सभेचे आयोजन करण्याचा आयोजकांकडून विचार केला जाऊ शकतो. पाऊस आणि हवामानाची स्थिती तपासल्यानंतर आयोजकांकडून पुढचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आयोजकांनी पीएम मोदींच्या सभेसाठी एस पी कॉलेजच्या मैदानावर खूपच मेहनत घेतली होती. पण आता जर आज पाऊस राहिला तर त्यांना सभेचे ठिकाणी बदलावे लागणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच पर्यायी सभा स्थळ निवडण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. त्याचसोबत विविध विकास कामांचे देखील उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोदी महाराष्ट्रासाठी काय घोषणा करणार याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. संध्याकाळी पीएम नरेंद्र मोदी यांची एस पी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पण पुण्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे या सभेच्या ठिकाणामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा फटका मोदींच्या सभेला बसण्याची शक्यता आहे. अशामध्ये सभास्थळ गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी बदलले जाण्याची शक्यता आहे.

PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?
PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा

भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. सध्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात सततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील साहित्य, वाहने, जनावरे, टपऱ्या, दुकाने इत्यादी तात्काळ हलविण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?
PM Modi Pune Visit: PM मोदींचा पुणे दौरा! शहरातील विविध ठिकाणे पार्किंगसाठी आरक्षित, खासगी उड्डाणांवरही बंदी; वाचा सविस्तर

पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली होती. आज देखील पुणे जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ आणि विजांच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.

PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?
PM Modi Pune Visit : PM नरेंद्र मोदी २६ रोजी पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com