PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा

PM Modi pune Tour update : पंतप्रधान मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा
PM Narendra Modi Pune SabhaSaam TV
Published On

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या गुरुवारी नियोजित पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरुपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट आणि पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्या वतीने ही माहिती जारी करण्यात आली आहे.

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आली आहेत.

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

पुण्यातील भिडे पूल नदी पात्र, निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग आणि पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील या कार्यक्रमासाठी बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड आणि शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग हा निश्चित करण्यात आला आहेत.

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा
Pune MNC Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सर्व माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे आणि त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com