PM Modi Pune Visit : PM नरेंद्र मोदी २६ रोजी पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा सविस्तर

Pm Modi Pune Visit Schedule : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गीकेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
PM Modi News
PM ModiSaam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांच उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गीका आणि भिडेवाड्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जय्यत तयारी करण्यात येत आहे.

कसा असेल पंतप्रधानांचा दौरा

संध्याकाळी ५.३५ वाजता मोदी पुणे विमानतळावर येणार

पुणे विमानतळावरुन मोदी शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला ५.५५ वाजता पोहोचतील

⁠शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथुन शिवाजीनगर ते स्वारगेट पंर्यतच्या भुयारी मेट्रोला हीरवा झेंडा दाखवणार

मेट्रोने प्रवास करत मोदी स्वारगेटला पोहचतील

स्वारगेट येथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार

स्वारगेट वरुन ६.३० वाजता मोदी एसपी कॅालेज येथे सभास्थळी पोहचतील

रात्री ७.५५ मिनीटांनी पंतप्रधान पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे रवाना

भिडे वाड्याच्या उद्घाटनावरून वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भिडे वाड्याच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आश्चर्य व्यक्त केलं ज्या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे त्या कामाचे पुन्हा भूमीपूजन करण्यासाठी पंतप्रधानांनी येणे हा मोठा विनोद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

PM Modi News
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा अचानक मृत्यू; आतकंवाद्यांना घरात दिला होता आश्रय

भिडे वाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे. ज्यात आपलं कर्तुत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अनुसरून पंतप्रधान मोदी हे महात्मा फुलेंच्या विचारांचा अपमान करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध व्यक्त केला.

नरेंद्र मोदी दौऱ्याअगोदर मेट्रो स्टेशन नावावरून वाद

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनचे नाव मंडई मेट्रो न देता महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन द्यावे अशी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन होणार आहे.यामध्ये मंडई मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या विरोधात आज मंडई मेट्रो स्टेशन समोर माळी महासंघातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. भूमिगत मार्गिकेचे उदघाटन होणार असले तरी अजून बरीच कामं बाकी आहेत. लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने अपूर्ण स्थानकाचे ही उदघाटन केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

PM Modi News
Supriya Sule : 'सरकार पॅनिक, फडणवीस गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो'; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुप्रीया सुळेंनी सरकारवर डागली तोफ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com