बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर ठाणे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारकडून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रीय सुळे यांनीही, आरोपीचा चेहारा झाकलेला होता. दोन्ही हात बांधले होते, पोलीस कुमक सोबत आहे, तरीही आरोपी पोलिसाची बंदूक हिसकावून कशी घेतो? असा सवाल सरकारला करत तोफ डागली आहे.
काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार झाला होता. जनआंदोलनाच्या माध्यमातून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती आणि हे सर्व घटनेच्या न्यायालयाच्या माध्यमातून व्हावी ही अपेक्षा होती. मात्र अशाप्रकारे आरोपीचा एन्काऊंट होणं, म्हणजे कुठेतरी शंका येते.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनतेला अपेक्षा होत्या. मात्र मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री झालेत. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हा तेव्हा राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, असे गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. हीट अॅण्ड रण सारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढलल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये जावून गोळीबार सुद्धा केला जातो. हे सर्व देवेंद्र पडणवीस गृहमंत्री असताना घडत असल्याचा गंभीर आरोप सुप्रीया सुळे यांनी केला आहे.
आरोपीला फाशी दिली असती तर पहिला पेढा मुख्यमंत्र्यांना स्वत: दिला असता. मात्र ज्याचा चेहरा झाकलेला आहे. हातात बेड्या असतात. सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्तात घेऊन जात असताना आरोपी पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन गोळ्या झाडतोच कशा असा सवाल त्यांनी केला आहे. एका पोलिसाला गोळ्या लागल्या आहेत. यात पोलीस बांधव जखमी झाला. तो ही कुणाचा तरी मुलगा आहे ना? . कोणत्याही आरोपीला कायद्याच्या चौकटीत शिक्षा झाली पाहिजे, असंही सुप्रीया सुळे यांनी म्हटलं आहे.
आरोपी अक्षय शिंदेला सोमवारी सायंकाळी पोलीस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते. याचदरम्यानअक्षय शिंदेने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला.तळोजा ते मुंब्रा दरम्यान भर रस्त्यात हा थरार सुरू होता. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षयला तीन गोळ्या लागल्या. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभर खळबळ माजली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.