Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात नक्की काय घडलं? पोलिसांनी सांगितला तळोजा ते मुंब्रा बायपास दरम्यानचा थरार

Akshay Shinde Encounter Update : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात नक्की काय घडलं, याची माहिती आज ठाणे आयुक्तालयाच्या पीआरओंनी दिली.
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde EncounterSaam Digital
Published On

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर झाला आहे का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी यावर आज खुलासा करताना, आरोपीविरोधात अजून एक गुन्हा दाखल होता. काल पोलीस अधिकारी काल त्याचा कायदेशीर ताबा घेण्यासाठी गेले होते. मात्र मुंब्रा पोलीस ठाणे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यातून त्या झटापटीत अक्षय शिंदेला गोळ्या लागल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पीआरओ शैलेश साळवी यांनी दिली.

या प्रकरणाची अजून तपासणी सुरू आहे प्रकरण अजून तपासात आहे. त्यामुळे मी अजून माहिती देऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.या घटनेत पोलीस जखमी झाले आहेत. एका पोलिसांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मुंब्रा बाय पासच्या जवळ मुंबा देवीच्या पायथ्याजवळ ही घटना घडली. तळोजा काराग्रुहातून ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार रस्त्यात घडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सायंकाळी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात असताना. अक्षय शिंदेने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षयला तीन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर आज पीआरओंनी स्वत: या प्रकरणाची माहिती दिली.

Akshay Shinde Encounter
Buldhana News: बुलडाण्याच्या सुपुत्राला वीरमरण, दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद

इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झालाच कसा असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाणे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विरोधकांकडून या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. एन्काऊंटर घडवून आणल्याचा आरोप होत आहे. काही नेत्यांनी याविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही म्हटलं आहे.

Akshay Shinde Encounter
Beed News : पोहण्यासाठी विहिरीत उडी घेतली, पण धाप लागल्याने बुडाली; अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने अख्खं गाव हळहळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com