Beed News : पोहण्यासाठी विहिरीत उडी घेतली, पण धाप लागल्याने बुडाली; अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने अख्खं गाव हळहळलं

Beed Ambajogai News : स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना एका 13 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या चनई परिसरात घडली.
Beed Ambajogai News
Beed Ambajogai NewsSaam TV
Published On

सध्या पावसाळा सुरु असल्याने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून तलाव तसेच विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे अनेकजण पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. अशातच पोहताना अनेकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना एका 13 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या चनई परिसरात घडली.

कल्याणी कानोबा गोचडे असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूने अख्खं गाव हळहळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कल्याणी ही सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला चांगलं पोहता येत होतं. त्यामुळं ती स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरली. मात्र, पोहताना तिला धाप लागल्याने ती पाण्यात बुडाली. यावेळी विहिरीच्या काठावर असलेल्या तिच्या भावासह चुलत्याने तिला पाण्यातून काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

परंतु कल्याणीला वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, कल्याणीच्या मृत्यूची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर कल्याणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केजमध्ये विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न

बीडच्या केज शहरातील अंकुर मस्के या विद्यार्थ्याच्या एका आरोपीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने अंकुरला गाडीमध्ये बस असं म्हटलं. या प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. मागील काही दिवसापासून हे अपहरणकर्ते या मुलाचा पाठलाग करत त्याला गाडीमध्ये बसण्यास सांगत होते.

परंतु या हुशार मुलाने याबाबतची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. यानुसार कुटुंबीयांनी मुलाच्या पाठीमागे जात याबाबत खातरजमा केली. संशयित लोक त्या ठिकाणी येताच त्यांना पकडून जमावाने चोप दिला. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited by - Satish Daud

Beed Ambajogai News
Buldhana Accident : बुलढाण्यात भरधाव एसटी बसने दुचाकीला उडवलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू, एकजण गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com