Buldhana Accident : बुलढाण्यात भरधाव एसटी बसने दुचाकीला उडवलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू, एकजण गंभीर

Buldhana ST Bus Accident : भरधाव एसटी बसने मेरा खुर्द फाट्यानजीक दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Buldhana ST Bus Accident
Buldhana ST Bus AccidentSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जालना महामार्गांवरील मेरा फाट्यावर सोमवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव एसटी बसने मेरा खुर्द फाट्यानजीक दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Buldhana ST Bus Accident
Amravati Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली; थरारक VIDEO

राजू खोलगडे (वय ४५) नंदू सगट (वय ३७) अशी मृतकांची नावे आहेत. तर ज्ञानेश्वर धोमाळकर (वय ४०) हे जखमी झाले आहेत. तिघेही केळवद येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिहवन महामंडळाची बस छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर नागपूरच्या दिशेने येत होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास बस मलकापूर जालना महामार्गांवरील मेरा फाट्याजवळ आली.

त्याचवेळी केळवद येथील तिघे मोटरसायकलने चिखलीकडे येत होते. मेरा खुर्द गावाजवळील एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. क्षणार्धात बसने समोरील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीवरील तिघेही दूर फेकले गेले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

त्याचबरोबर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासगी बस अपघातात ४ सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अमरावतीतील परतवाडा ते धारणी रोडवरील सेमाडोह नजीक घाटातील वळण रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट खोल दरीत कोसळली. या घटनेत ४ सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Buldhana ST Bus Accident
Buldhana Accident : ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com