Maharashtra Weather: परतीचा पाऊस जोरदार बरसणार! 'या' १० जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain Weather Update News: आजही (गुरुवार, ता. २६ सप्टेंबर) राज्यभरात परतीचा जोरदार बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Weather: परतीचा पाऊस झोडपणार! राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार, IMD अलर्ट जारी; वाचा सविस्तर...
Maharashtra Weather ForecastSaam Tv
Published On

Maharashtra Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह कोकण, रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई, पुण्यामधील नागरिकांचे चांगलेच हाल झाले. आजही (गुरुवार, ता. २६ सप्टेंबर) राज्यभरात परतीचा जोरदार बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Weather: परतीचा पाऊस झोडपणार! राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार, IMD अलर्ट जारी; वाचा सविस्तर...
Maharashtra Politics: मराठवाडा-विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; शाह - पवारांमध्ये राजकीय कुस्ती

आजचा हवामान अंदाज..

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather: परतीचा पाऊस झोडपणार! राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार, IMD अलर्ट जारी; वाचा सविस्तर...
Kalyan Crime : ज्योतिषाकडे हात दाखवू म्हणून नेले अन् खुर्चीला बांधले; माजी नगरसेविकेच्या पतीसोबत घडले भयंकर

दुसरीकडे बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather: परतीचा पाऊस झोडपणार! राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार, IMD अलर्ट जारी; वाचा सविस्तर...
Pune school Bus Accident : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com