Pune school Bus Accident : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Pune school Bus Accident video : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO
Pune school Bus Accident Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : राज्यात सतत अपघातांच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. याचदरम्यान, विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा अपघात झाल्यची घटना पुण्यात घडली. या अपघातात सुदैवाने विद्यार्थ्यांना कोणताही दुखापत झाली नाही. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात डंपरचा गंभीर अपघात होता होता वाचला. पुण्यातील वाघोली लोहगाव रोडवर १० ते १५ मुलांनी भरलेली बस आणि डंपरचा किरकोळ अपघात झाला. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील लोहगाव रोडवर ग्रीन रिपब्लिक सोसायटीसमोर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO
Gujrat Accident: चालकाचा डोळा लागला, भयंकर घडलं, सुसाट कार ट्रकमध्ये घुसली; ७ जण जागीच ठार| VIDEO

नेमका अपघात कसा झाला ?

पुण्यातील खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुले घेण्यासाठी लोहगाव रोडवरील सोसायटीमध्ये आली होती. विद्यार्थ्यांनी भरलेली बस सोसायटीतून बाहेर पडताना बस अर्ध्या रस्त्यावरआली. लोहगावकडे भरधाव जाणारा क्रॉंकिट डंपर हा बसवर आदळला असता. मात्र, डंपर चालकाने रस्त्यावर खाली डंपर घातला. तरीही बसच्या पुढील भागाला डंपरची धडक बसली. या किरकोळ अपघातानंतर उपस्थित नागरिक धावत बसजवळ गेले. त्यावेळी त्यांना मुले सुरक्षित असल्याचे त्यांना दिसले. अपघातात बसचा पुढील भाग तुटला. त्यानंतर त्या परिसरातील सोसाटीतील नागरिकांनी पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती दिली.

पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO
Nashik Accident : ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, शिवशाही बसची ५ वाहनांना धडक; दोन वाहनांचा झाला चुराडा

लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. दैव बलवत्तर म्हणून अपघात झाला नाही, बसला किरकोळ धडक बसली. या अपघातानंतर मुले सुरक्षित आहेत. मात्र, बस व डंपर चालक या दोन्ही बेजबाबदार चालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणवीर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com