Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Mumbai Local Train News : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही तासांच्या पावसात मुंबई लोकलला मोठा फक्त बसला आहे. यातच ट्रेनची सद्यस्थिती काय आहे, जाणून घेऊ...
मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या
Mumbai RainSaam tv
Published On

गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही तासांच्या पावसातच मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यातच मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत उद्या दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही बीएमसीने म्हटलं आहे.

मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या
Heavy Rain in Mumbai : मुंबईत तुफान पाऊस! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित; पुढील काही तास धोक्याचे, VIDEO

मुसळधार पावसाचा मोठा फटका आता सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. कारण काही तासांच्या पावसातच मुंबईत रेल्वे रुळावरही पाणी साचलं आहे. ज्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

लोकल ट्रेनची सद्यस्थिती काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. विद्याविहार ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन लोकल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे.

मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या
Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग; अवघ्या ३ तासात १२४ मिलिमीटर पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, सोसायटीमध्ये शिरलं पाणी

भांडुप - नाहूर डाऊन लोकल मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान अप आणि डाऊन लोकल मार्गावर 30 किमी प्रतितास वेगाने ट्रेन चालवण्याचे सूचना देण्यात आली आहे.

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी सब वे सखल भाग असल्यामुळे पाण्याखाली गेला आहे असून सबवेत तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेत पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com