Heavy Rain in Mumbai : मुंबईत तुफान पाऊस! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित; पुढील काही तास धोक्याचे, VIDEO

Heavy Rain in Mumbai News : मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
 मुंबईत तुफान पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पुढील काही तास धोक्याचे
Heavy Rain in Mumbai News Saam tv
Published On

मुंबई : मुंबईत गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस सुरु आहे. गेल्या काही तासांत कोसळलेल्या पावसांमुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे. जोरदार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर हवामान विभागाने दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला होता. त्यानंतर आज बुधवारी देखील जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. मोठ्या विश्रांतीनंतर मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबई, ठाणे आणि परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर आज दुपारपासूनच सुरु झालेल्या पावसाने कामावरून घरी निघालेल्या लोकांचे चांगलेच हाल होत आहेत.

मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने

मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी होऊन लोकल ट्रेन अर्ध्या तास उशिराने धावत आहेत. यामुळे घरी जाणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. घरी परतण्याच्या वेळेला पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. दुपारपासून सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत.

नवी मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटिंग

नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील मॅफको मार्केट परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. नवी मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहत. यामुळे घरी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. हवामानाने दिला पावसाचा इशारा

हवामान विभागाने उद्यापर्यंत दिला पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज आणि उद्या सकाळपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर या ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

अंबरनाथ आणि बदलापुरात वीजपुरवठा खंडित

अंबरनाथ आणि बदलापूरच्या काही भागात मागील ३ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे.पडघा येथून येणाऱ्या मुख्य वाहिनीत बिघाड झाल्यानं वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरू होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. बिघाड दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com