Gujarat Sabarkantha Accident : 120 किमीचा वेग अन् काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; भीषण अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर, VIDEO

Gujarat Sabarkantha Accident video : फिरायला निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताआधीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Gujrat Accident:
Gujrat Sabarkantha Car- Truck Accident:Saamtv
Published On

नवी दिल्ली : काही मित्र पिकनिकसाठी निघाले. अनेक दिवसांनी गाठभेट झालेल्या मित्रांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या मित्रांची कार १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावत होती. या भरधाव कारचा अचानक भीषण अपघात झाला. या अपघातात ७ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. चालकाने भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्याने ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या भरधाव कारचा अपघाताआधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील साबरकांडा येथील या भीषण कार अपघाताआधीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या कारमधील मित्र मोठ्या आवाजात गाणे ऐकत होते. या मित्रांची कार १२० किमी वेगाने धावत होती. या भरधाव कारचा अपघात झाल्यानंतर कारमधील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात होण्याआधी या कारमधील भरत केसवाणी नावाच्या तरुणाने व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला होता. या भरत केसवाणीचा देखील अपघात झाला आहे. या व्हिडिओमधील सर्व जण वेगवान कारमध्ये गाणे ऐकत आणि गात होते.

अपघात कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व मित्र त्यांच्या परदेशावरुन आलेल्या मित्रासोबत राजस्थानला फिरायला निघाले होते. राजस्थानला जायला निघाले असताना हिम्मननगरजवळ या भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Gujrat Accident:
Accident News : दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चारजण गंभीर, मृतांमध्ये पाचोऱ्यातील एकाचा समावेश

हिम्मतनगरजवळ भीषण अपघात झाल्यानंतर अग्निशमन दलाने कारमधून मोठ्या प्रयत्नाने मृतदेहांना बाहेर काढलं. या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या आधी महाराष्ट्राच्या जालन्यातील एक ट्रक आणि बसच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. या गेवराईवरुन अंबडला जाणारी बस आणि मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची एकमेकांना धडक बसली. या धडकेत ट्रकचा समोर भाग अक्षरश: चक्काचूर झाला होता.

Gujrat Accident:
Jalgaon Accident : महाविद्यालयाच्या कामासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक, एकजण जखमी

दरम्यान, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये सोमवारी झालेल्या अपघातात लोक जनशक्ती पक्षाच्या (आर) वैशाली येथील खासदार वीणा देवी यांच्या पुत्राचा अपघातात मृत्यू झाला. हा भीषण अपघात मुजफ्परपूरच्या करजा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघात खासदार वीणा देवी आणि जनता दलाचे आमदार दिनेश प्रसाद यांचा मुलगा राहुल राज उर्फ छोटू सिंह यांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com