Maharashtra News Live Updates: पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू,भांडुप नाहूर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 26 september : आज गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मोदींचा पुणे दौरा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू 

लोकलने प्रवास करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके असे या मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथून आपली ड्युटी संपवून डोंबिवली येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असताना लोकलमधून पडून गोंदके हे गंभीर जखमी झाले. गोंदके हे रात्रभर रेल्वे रुळावरच जखमी अवस्थेत पडून राहिल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार शहरात जोरदार पावसाला सुरुवात

नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार शहरात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर कडक ऊन असून संध्याकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकळ्यापासून काहीसा सुटका मिळाला आहे. मात्र काढणीसाठी आलेल्या मिरची, सोयाबीन या पिकांना या पावसाच्या फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धर्मवीर २ सिनेमा शिवसेनेच्यावतीने मोफत दाखवला जाणार

पुण्यात धर्मवीर २ सिनेमा शिवसेनेच्यावतीने मोफत दाखवला जाणार आहे. शिवसेनेच्या वतीने उद्या धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे मोफत सिनेमा प्रदर्शित होत आहे. शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्याकडून शिवसेना कार्यालयात सिनेमाचे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी तिकीट मिळणार आहे.

छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली, बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू

छगन भुजबळ यांची तब्येत अचनाकपणे बिघडली असून त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणलं. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्याच्या भोरमध्ये दिवाळी फराळ किराणा किट घेण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर नागरिकांची लाईन

भोर विधानसभेतून भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या किरण दगडे पाटील यांच्याकडून नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी फराळ किराणा किटचं वाटप करण्यात येणारेय - यासाठी नाव नोंदणी करून २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कूपन वाटप करण्यात येतयंपुण्याच्या भोरमध्ये दिवाळी फराळ किराणा किट घेण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर नागरिकांची लाईन

मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारच्या सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना

मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे. सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी. मंकी पॉक्सविषयीची माहिती, संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे. सध्या देशभरात ३६ प्रयोगशाळा व ३ PCR किट्सना तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

सिनेट निवडणुकीवरून मुंबई उच्च न्यायालय पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाला झापलं

उद्याच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार आहे. मतमोजणी करून निकाल जाहीर करा , असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. उद्याची मतमोजणीला स्थगिती देण्यासंदर्भात पत्रक काढण्यात आल होतं. या पत्रकावरून मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावलेत. दोन वर्ष रखडलेली सिनेट निवडणूकदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर झाली संपन्न आहे.

Yavatmal Crime:  यवतमाळात माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

यवतमाळ शहराच्या दत्त चौकातील रामायण हॉटेल जवळ एका माजी सरपंचावर दोघांनी चाकूने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. दत्त चौक परिसरातील रामायण हॉटेल समोर घडली रमेश बिसनकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहेत. दरम्यान याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

PM Aawas Yojana:   बारामतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा आणि लाभार्थी मेळावा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा आणि लाभार्थी मेळावा दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शासन आणि जनता यातील दुवा म्हणून मी काम केले आहे , दौंड तालुक्यातील सुमारे २५०० घरकुले मंजूर झाली असून, त्यापैकी ६०० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

अमरावतीत धुवाँधार पावसाला सुरुवात; विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

अमरावतीतील रस्ते जलमय होण्यास सुरुवात झालीय. पावसामुळे शहरातील वाहतूकही मंदावली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवलीय.

नाशिक शहरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय. गेल्या अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झालीय. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट, सकाळी काही वेळ झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू आहे.

धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक; अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवला

गेल्या आठ दिवसांपासून नेवासाफाटा येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्ग अडवला आहे. दरम्यान सरकारने दखल न घेतल्याने दोन आंदोलकांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या चार तासांपासून दोन उपोषणकर्ते आंदोलक बेपत्ता आहेत. जलसमाधी घेतली असल्याची चिठ्ठी मिळाली आहे. गोदावरी नदीत शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम रवाना झालीय. प्रवरासंगम येथील पुलावरून या दोन्ही आंदोलकांनी उडी मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्रापुरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला तात्काळ अटक

पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे . यामध्ये ३ वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय शिंदेची आई-वडील दफनभूमीच्या शोधात

बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी त्याचे आई वडील आणि काका पोलिसांसोबत समशान भूमी जागा शोधत असून हिंदू स्मशानभूमी येथे असलेल्या दफन मूवी त्यांनी एक जागा निवडली आहे, त्यांचा या जागेवर विचारविनिमय सुरू आहे.

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक

पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर यांचे कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरु.

बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलन सुरु.

जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात तुपकर ठोकणार मुक्काम.

रविकांत तुपकर बिस्तरा घेऊन कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचले.

Maharashtra News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

पुण्याचा जिल्ह्यात गेले तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं नुकसान.. लोणी काळभोर येथील संजय जगताप यांच्या शेतात पाऊस आणि ओढ्याच पाणी शेतीत गेल्याने शेतीचा नुकसान.. ग्रामपंचायत दुर्लक्ष केल्याचा शेतकऱ्याचा आरोप.. उडाला भिंत नसल्याने पाणी शेतीत जात असल्याचा आरोप केला आहे.चालू पीक पाण्यात गेलं आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांची होणार पोलीस चौकशी

ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांची होणार पोलीस चौकशी

राजकोटमधील पुतळा कोसळ्याप्रकरणी वैभव नाईक यांची होणार चौकशी

सिंधुदुर्ग पोलीसांची वैभव नाईक यांना नोटीस

वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळ्यांचं घोटाळा झाल्याचं केले होते आरोप

पुरावे पोलीसांकडे सादर करून सहकार्य करण्याची विनंती

राजधानी एक्सप्रेसमधील अन्नात आढळल्या अळ्या

राजधानी एक्सप्रेस मधील अन्नात आढळल्या अळ्या

राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या आज सकाळच्या नाष्ट्यात मिळाल्या आळ्या

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने राजधानी एक्सप्रेस मधून येणाऱ्या प्रवाशांना आज सकाळी पोह्यांमध्ये मिळाल्या आल्या

भरमसाठ प्रवास भाडे असणाऱ्या राजधानी एक्सप्रेस मध्ये निकृष्ट अन्न मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

अंबरनाथमध्ये दुर्मिळ जातीच्या हरणाच्या शिकारीचा प्रयत्न

अंबरनाथमध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जखमी अवस्थेत अंबरनाथ एमआयडीसी भागात आढळल्यानंतर त्याला उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत सुरू असलेल्या वक्फ विधेयकावरील संसदिय संयुक्त समितीच्या बैठकीत राडा

मुंबईतल्या सहा जागांवरुन महाविकास आघाडीत वादाचा तिढा

भायखळा, अणुशक्ति नगर, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि चेंबूर या‌ जागांवर वाद होण्याची शक्यता

या सहा जागांपैकी काही ठिकाणी दोन पक्षांचा दावा तर काही ठिकाणी तीन पक्षांचा दावा

मुंबईत ठाकरे गटाला किमान २३ जागांची अपेक्षा

कपालेश्वर मंदिरातील दानपेट्या सिल

Summary

नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आले आहेत.कपालेश्वर महादेव मंदिर परिसरातील पाच दानपेट्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्तांनी या दानपेट्यांवर सरकारी कुलूप लावण्याचा आदेश दिला आहे... हा निर्णय पुढील अंतिम आदेश होईपर्यंत लागू राहील, अस सांगण्यात आले असून मंदिरातील दानपेट्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय... गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून दोन गटात वाद झाला होता... या वादानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी मंदिरातील दान पेट्या सील करण्याचे आदेश दिलेत...

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॅा. सुभाष चौधरी यांचं आज पहाटे निधन

तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा रद्द

पुण्यातील पावसामुळे नरेंद्र मोदीचां पुणे दौरा रद्द

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पावसाचे विघ्न

Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आँरेज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यत 104 टक्के पाऊस पडला.

Baramati News: उजनीतून भीमा पात्रात 31 हजार 600 क्युसेकने विसर्ग

उजनी धरणाच्या वरील साखळी मधील सर्व धरणं क भरली असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होतेय. उजनी धरण काटोकाट भरलं असल्यानं उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आलेत.सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरले असून उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे.

Rahul Gandhi Kolhapur Visit: राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येणार 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. गांधी यांच्या या दौऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे. त्यामुळे राहुल यांचा हा दौऱ्या महत्त्वाचा मानला जातो.

Solapur Rain News: कुरनूर धरण १००% भरलं, पाण्याची चिंता मिटली

सतत पडणारा परतीचा पाऊस आणि एकरुख योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे १००% धरण भरले आहे. अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण १००% भरल्यामुळे २१० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

मागील वर्षी कुरनूर धारणात केवळ ३०% च होता पाणीसाठा,त्यामुळे तालुक्यात निर्माण झाली होती दुष्काळजन्य परिस्थिती. मात्र यंदा धरण १०० % भरल्याने अक्कलकोट तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, 

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.खटाव या दुष्काळी भागातील मायणी गावाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी वस्तीत आणि दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे.शेती पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.तर अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

Solapur News: पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे येथून सोलापूर होटगीरोड विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होटगी रोड विमानतळावर होणार आहे.या ठिकाणी छोटेखानी सभामंडप उभारले असून,या ठिकाणी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

PM Modi Pune Visit: PM मोदींना देण्यात येणार 'संत तुकाराम पगडी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींसाठी पुण्यात खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. दरवेळी मोदींच्या पुणे दौऱ्यातील पगडी चर्चेचा विषय ठरते. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी ही आकर्षक पगडी तयार केली आहे. वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडी मार्फत मोदींकडून करण्यात येणार आहे.

Amit Shah Maharashtra Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर

मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार

या बैठकीनंतर मुंबई ठाणे आणि कोकण मधील भाजपाचे उमेदवार निश्चित होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी; अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नद्यांना पूर आला तर नदी नाले देखील खळखळून वाहू लागले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाड परिसरात असणाऱ्या लाडसावंगी शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक पिकांचा मोठा नुकसान झालय. कपाशी आणि सोंगून ठेवलेली मक्का या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली मक्का उध्वस्त झाली. त्यामुळे मोठा फटका या पावसाचा शेतकऱ्यांना बसलाय. दरम्यान झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

PM modi pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे स्थळ बदलण्याची शक्यता

Rain Update : नाशिक जिल्ह्यातील ११ धरणांमधून पाण्याचा विसर्ग

- दारणा धरणातून ३६१२ क्यूसेकनं दारणा नदी पात्रात पाणी सोडलं

- इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग

- तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून १३५०० क्यूसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग

- दारणा, गंगापूर, नांदूरमध्यमेश्वरसह जिल्ह्यातील ११ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग

- जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा

- पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता

mumbai rains : मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Summary

मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे. कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता, मात्र कालपेक्षा त्याची तीव्रता कमी असेल.

मागील २४ तासांत मुंबईतील अनेक भागात अतिवृष्टी, काही ठिकाणी २५० मिमीहून अधिक पाऊस पडला. पालघरमध्ये आज काही भागात अतिवृष्टीची शक्यता, एक दोन ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.

पुण्यासाठी आज आॅरेंज अलर्ट, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

नाशिकसाठी आज रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, यलो अलर्ट जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com