Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोर डोक्यात दगड घातला

Pune Police: पुण्यामध्ये सासऱ्याने सुनेची हत्या केली. कौटुंबीक वादातून घटना घडली. ६ महिन्यांच्या बाळासमोर डोक्यात दगड घालून संपवलं. या घटनेमुळे पुणे हादरले. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या

  • सासऱ्याने सुनेची हत्या केली

  • आरोपी सासरा झाला फरार

  • नांदेड सिटी पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यामध्ये सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. भिंतीवर डोकं आपटून आणि दगडाने मारहाण करत आरोपीने सुनेला जागीच संपवलं. त्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला. या घटनेमुळे पुणे हादरले. या प्रकरणा नांदेड सिटी पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. स्वाती तेजस चौधरी (वय ३१ वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. भानुदास भास्कर चौधरी (वय ५७ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. स्वातीचा नवरा तेजस शिवाजीनगर कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी तेजस चौधरी नेहमीप्रमाणे कामावर गेले. घरामध्ये स्वाती तिचे सहा महिन्यांचे बाळ आणि सासरा हे तिघे होते.

स्वाती आणि तिचा सासरा भानुदास यांच्यामध्ये नेहमी कौटुंबीक कारणांवरून वाद होत होते. शनिवारी देखील दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर स्वाती बाथरुममध्ये कपडे धुण्यासाठी निघून गेली. यावेळी आरोपी भानुदास चौधरी त्याठिकाणी गेला. त्याने स्वातीचे डोकं भिंतीवर आपटले त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वातीचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. सूनेची हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पळून गेला. तेजस यांच्या बहिणीने वहिणी स्वातीला फोन केला पण ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे तिने तेजस यांना फोन करून सांगितले.

तेजस यांनी शेजारी राहणाऱ्या एका महिलेला फोन करून घरामध्ये काय झाले पाहण्यास सांगितले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा घरातील परिस्थिती पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरामध्ये स्वाती बाथरूमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तर त्यांचे बाळ घरामध्येच होते. त्यांनी तात्काळ स्वातीचा नवरा तेजस आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वातीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासााठी रुग्णालयात पाठवला. नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT