वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

IAF AN-32 aircraft catches fire after landing : आसाममधील जोरहाट एअरबेसवर भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहू विमानाला लँडिंगनंतर अचानक आग लागली. अग्निशमन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
IAF Plane crashes
IAF Plane crashes
Published On

आसाममधील जोरहाट एअरबेसवर शनिवारी भारतीय वायुसेनेचे (IAF) 'AN-32' हे मालवाहू विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. धावपट्टीवर उतरल्यानंतर अचानक या विमानाला भीषण आग लागली. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच विमानातून आगीच्या प्रचंड लपट उठल्याने एअरबेसवर एकच खळबळ उडाली.

वायुसेनेच्या अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथकाने तातडीने धाव घेत आग विझवण्याचे आणि विमानातील चालकांसह कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. विमानातील जीवितहानी किंवा अपघाताच्या अचूक कारणांबाबत अद्याप वायुसेनेकडून अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

IAF Plane crashes
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा बदल, प्रति तोळा किती रूपयांना मिळणार? पाहा ताजे दर

प्राथमिक अहवालानुसार, विमानने एअरपोर्टच्या धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले होते. पण त्यानंतर लगेचच त्यात आग लागली अन् धुराचे लोट दिसू लागले. आगी लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर एकच खळबळ उडाली. हवाई दलाच्या आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी धावले. त्याशविया अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि विमानातील कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तात्काळ आपत्कालीन बचावकार्य सुरू करण्यात आले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी विमानातील प्रवाशांच्या प्रकृतीबद्दल किंवा अपघाताच्या नेमक्या कारणाबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

IAF Plane crashes
Mumbai water crisis : मुंबईकरांची चिंता वाढली! वैतरणा धरण कोरडे, ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

या घटनेनंतर भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. आज जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या एका एएन-३२ विमानाचा अपघात झाला आहे. अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील देण्यात येईल, असे हवाई दलाकडून सांघण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाचे अधिकारी विमानात लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेत आहे.

IAF Plane crashes
Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com