

सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील चढ उतार आणि गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या मागणीमुळे किमती पुन्हा वाढल्या आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर आज प्रति तोळा ₹१,४९,०८० रूपये इतका आहे. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई गुजरातमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच सोने-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार नोंदवण्यात आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले. शुक्रवारीही सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. पण त्याआधी २ दिवस सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
भारतातील सोन्याचा भाव
आज देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ५० रूपयांनी वाढून ₹१४,९०८ रूपयांवर पोहचलाय. तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१३,६६५ रूपयांवर पोहचलाय. शुक्रवारच्या तुलनेत यामध्ये ४५ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,१८१ इतका आहे. यात ₹३७ ची वाढ झाली.
प्रति तोळा सोन्याचा भाव किती वाढला?
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ५०० रूपयांनी वाढून ₹१,४९,०८० इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,३६,६५० रुपये इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत यात ४५० रुपयांनी वाढ झाली.
आज चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. चांदीचा भाव प्रति ग्रॅम ₹260.10 इतका नोंदवला गेला आहे. एक किलो चांदीचा भाव सध्या सुमारे ₹260,000 इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.