Mumbai water crisis : मुंबईकरांची चिंता वाढली! वैतरणा धरण कोरडे, ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

mumbai dam water level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील जलसाठा केवळ १२ टक्क्यांवर आला आहे. सध्याचा साठा अवघ्या ४५ दिवसांसाठी पुरेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Water Crisis
Water CrisisSaam TV
Published On

Mumbai water crisis latest update : मुंबईकरांवर आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. सध्या धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा शिल्लक साठा साधारणपणे पुढील दीड महिना (४५ दिवस) पुरेल इतकाच आहे.

चालू वर्षात 'एल निनो'च्या प्रभावामुळे जर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर मुंबईत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचे वेळेत आगमन न झाल्यास पाणीकपातीचे संकट अधिक गडद होणार असल्याने प्रशासनाने आत्तापासूनच मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची स्थिती काय ?

  • भातसा – 43.36%

  • मोडक सागर – 32.44%

  • तुळशी – 24.66%

  • मध्य वैतरणा – 14.48%

  • विहार – 11.33%

  • तानसा – 7.15%

  • अप्पर वैतरणा – 0% साठा (उपयुक्त साठा नाही)

(आकडे 11 जूनपर्यंत)

Water Crisis
Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये फक्त १२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला फक्त दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्याचे सांगितले जातेय. मुंबईमध्ये सध्या १० टक्क्यांची पाणीकपात आहे, तरीही परिस्थिती गंभीर आहे. पुढील काही महिन्यांत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात समाधानकारक पाऊस न पडल्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

Water Crisis
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा बदल, प्रति तोळा किती रूपयांना मिळणार? पाहा ताजे दर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाण्याचा साठा कमालीचा खालावला असून, मुंबईकरांवर पाणीबाणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, धरणांमध्ये आता अत्यंत मर्यादित साठा शिल्लक असून अप्पर वैतरणा धरण पूर्णपणे कोरडे (०% साठा) पडले आहे. तर दुसरीकडे भातसा आणि मोडक सागर सोडल्यास इतर सर्व धरणांमधील पाणीसाठा २५ टक्क्यांच्याही खाली आला आहे. मान्सून लांबल्यास मुंबईत तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत काटकसरीने वापरण्याची गरज आहे.

Water Crisis
वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com