Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...

3 Youth Died After Jumping Pawana River: मावळमधील पवना नदीमध्ये बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला. हे तरुण फिरण्यासाठी याठिकाणी आले होते. पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...
3 Youth Died After Jumping Pawana RiverSaam Tv
Published On

Summary -

  • पवना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू

  • पोहता येत नसतानाही नदीत उडी मारली

  • पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने घडली घटना

  • तिन्ही तरुण फिरण्यासाठी या ठिकाणी आले होते

दिलीप कांबळे, मावळ

पुण्यातल्या मावळ तालुक्यातील थूगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पवना नदी पात्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला. हे तरुण आपल्या मित्रांसोबत याठिकाणी फिरण्यासाठी आले होते. पवना नदीमध्ये त्यांनी पोहण्यासाठी उडी मारली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने या तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयान शेख, प्रथमेश शिंदे आणि आश्विन भालेराव अशी मृत तरुणांची नावं होती. हे तरुण पुणे येरवडा येथून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आणि पोहण्यासाठी थू गाव येथील पवना नदीवर आले होते. यापैकी कोणालाही पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसंच खोल पाण्याच्या भवऱ्यात सापडल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...
Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर, दुपारनंतर पावसाचा अंदाज

उन्हाचा तडाखा वाढल्याने हे तिघेही पोहण्यासाठी पवना नदी पात्रात उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे आणि ते भोवऱ्यात अडकले. त्यामुळे नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ तिघेही नदीपात्रातून बाहेर न आल्यामुळे त्याचे मित्र घाबरले. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना सांगितले. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह कामशेत येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मावळ तालुक्यात याच आठवड्यात पोहण्यासाठी गेलेल्या विविध ठिकाणी एकूण ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी पाण्यात उतरताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...
Pune News: झेडपीच्या शाळांमध्ये आता १० वीपर्यंतचे शिक्षण; पुणे जिल्ह्याचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com