Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर, दुपारनंतर पावसाचा अंदाज

Pune Temperature: पुण्यामध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. पुण्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. अशात दुपारनंतर पुणयात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. पुण्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून पुढील दोन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे शहरात कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन ते ४०.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. लोहगाव परिसरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात शहरात गारांचा पाऊस पडला होता. मात्र हवामानातील प्रतिकूल घडामोडींमुळे चार दिवसांपासून पारा ३९ ते ४१ अंशावर गेले. पुणे शहराबरोबरच जिल्हासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात तापमानात लक्षणे वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com