मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’मुळे वेळेची मोठी बचत|VIDEO

Mumbai Pune Missing Link Opening Date May 1: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून, येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन निमित्त हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील हा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज या मार्गावर होणाऱ्या तासनतास वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता या नव्या मार्गामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार राहणार आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी तब्बल अर्धा ते एक तासांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची मोठी बचत होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com