Pune : पुणे पुन्हा हादरले! चाकणमध्ये ३ वर्षाच्या मुलावर अत्याचार; हत्या केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरला अन्...

Pune Chakan Rape Murder Case News : पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात ३ वर्षांच्या चिमुकल्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
BRUTAL CHILD RAPE MURDER IN CHAKAN PUNE SHOCKS MAHARASHTRA
BRUTAL CHILD RAPE MURDER IN CHAKAN PUNE SHOCKS MAHARASHTRASaam Tv
Published On
Summary
  • चाकणमध्ये ३ वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूर हत्या

  • आरोपीने मुलाला फसवून नेऊन अत्याचार केला

  • गुन्हा लपवण्यासाठी गळा चिरून हत्या

  • पोलिसांनी १२ तासांत आरोपीला अटक केली

  • संपूर्ण राज्यात संताप आणि भीतीचे वातावरण

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातून समोर आलेल्या एका अत्यंत भीषण आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. भोर तालुक्यातील अलीकडील घटनेची धग अद्याप शांत झालेली नसताना, आता तीन वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खालुंब्रे गावाच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत होता. परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला त्याने फसवून आपल्या खोलीत नेले. त्यानंतर त्या चिमुकल्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलाचा गळा चिरून खून केला. एवढ्यावरच न थांबता, मृतदेह एका बॅगेत भरून ठेवत तो घटनास्थळावरून फरार झाला.

BRUTAL CHILD RAPE MURDER IN CHAKAN PUNE SHOCKS MAHARASHTRA
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

दरम्यान, मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. काही वेळातच पोलिसांना माहिती देण्यात आली. महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयिताचा माग काढला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध घेत पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो आपल्या मूळ गावी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

BRUTAL CHILD RAPE MURDER IN CHAKAN PUNE SHOCKS MAHARASHTRA
Cancer : पुरुषांमध्ये 'या' प्रकारच्या कर्करोगांचा धोका जास्त असतो; वेळीच करा उपचार

पीडित मुलगा हा मध्यप्रदेशातून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या दाम्पत्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ‘पोस्को’ कायद्यान्वये तसेच खुनाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com