Shreya Maskar
रायगड जिल्ह्यात प्रबळगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात वसलेला कलावंतीण दुर्ग वसलेला आहे. ज्याची उंची २,२५० फूट आहे. हा किल्ला खडकात कोरलेल्या अतिउतार असलेल्या पायऱ्यांसाठी थरारक मानला जातो.
कलावंतीण दुर्ग किल्ल्याला 'स्वर्गाकडे जाणारी पायरी' म्हणूनही ओळखले जाते. हा तटबंदी नसलेला खडकाळ सुळका आहे.
कलावंतीण दुर्ग हे मूळतः बहामनी सल्तनतीच्या काळात एक टेहळणीचे ठिकाण (वॉचटावर) म्हणून बांधले गेले होते. त्यानंतर १५ व्या शतकाच्या सुमारास 'कलावंतीण' नावाच्या राणीसाठी यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि खडकात कोरलेल्या पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली.
ऐतिहासिक नोंदीनुसार, 'राणी कलावंतीण' मुळे कलावंतीण दुर्ग हे नाव पडले.
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडचा जुळा किल्ला आहे. कल्याण, पनवेल आणि कोकण किनारपट्टी यांच्या दरम्यान पश्चिम घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हे ठिकाण इतिहासात महत्त्वाचे होते.
कलावंतीण दुर्गाचा उपयोग महत्त्वाचे लष्करी टेहळणी केंद्र म्हणून करण्यात आला. प्रबळगड पूर्वी मुरंजन म्हणून ओळखला जात असे.
कलावंतीण दुर्ग हा आव्हानात्मक ट्रेकिंग स्पॉट आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवत येतो. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येथे पर्यटक येतात. पावसाळ्यात कलावंतीण दुर्ग चढणे खूपच खतरनाक आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.