Monsoon Destination : पाऊस, बोटिंग अन् निसर्गाचा मोहक नजारा, पाहा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'हे' सुंदर सरोवर

Shreya Maskar

सापुतारा

सापुतारा तलाव हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गुजरातच्या एकमेव हिल स्टेशनचे आकर्षण आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गाहून सुंदर होते.

Saputara | google

सापुतारा तलाव

सापुतारा तलाव मुख्य शहरापासून फक्त 1.5 किमी अंतरावर डांग जिल्ह्यात आहे. पॅडल आणि रोबोटींगसाठी हे प्रसिद्ध आहे. येथे हिरवेगार बागा, खेळाची मैदाने आहेत, त्यामुळे लहान मुलांना येथे तुफान मजा येईल.

Saputara Lake | google

कृत्रिम तलाव

सापुतारा तलाव हे मानवनिर्मित (कृत्रिम) आहे. हे दोलायमान लेकसाइड मनोरंजन आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या सुंदर नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.लेक गार्डन आणि रोझ गार्डनर देखील येथे आहे.

Artificial lake | google

कसं जायचे?

सापुताऱ्याला जाण्यासाठी मुंबईहून नाशिक रोडपर्यंत एक्सप्रेस ट्रेनने जाऊ शकता. त्यानंतर नाशिक सीबीएस बस स्थानकावरून सापुताऱ्यासाठी एमएसआरटीसीची बस पकडा.

how to go | google

कधी जायचे?

सापुतारा सरोवराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हिवाळ्याच्या महिन्यांत (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) आणि पावसाळा (जुलै ते सप्टेंबर) आहे. तेव्हा येथे हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो.

when to go | google

सापुतारा हिल स्टेशन

सापुतारा हे गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन आहे. येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. तसेच येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट देखील करता येते.

Saputara Hill Station | yandex

साहसी खेळ

पॅराग्लायडिंग, नौकाविहार, जॉर्बिंग आणि निसर्ग ट्रेकिंग यांसारख्या साहसी खेळांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मित्रमंडळी आणि जोडीदारासोबत येथे नक्की ट्रिप प्लान करा.

Paragliding | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : हिरव्यागार निसर्गात लपलाय इतिहास, वीकेंडला पुण्यातील 'हा' Hidden किल्ला एकदा पाहाच

Pune Fort | saam tv
येथे क्लिक करा...: