Shreya Maskar
विसापूर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. किल्ला समुद्रसपाटीपासून १,०८४ मीटर उंचीवर वसलेला आहे.
विसापूर किल्ला पावसाळी ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. विसापूर किल्ला लोहगडच्या अगदी जवळ (जुळा किल्ला ) म्हणून प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग करताना येथे धबधब्यांचा सुंदर नजारा पाहा.ला मिळतो.
विसापूर किल्ला तांत्रिकदृष्ट्या नंतरच्या काळात (इसवी सन १७१३-१७२० दरम्यान) पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला असला, तरी तो शिवाजी महाराजांच्या वारशाशी घट्ट जोडलेला आहे.
विसापूर किल्ला मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी इसवी सन १७१३ ते १७२० या काळात बांधला होता.
विसापूर किल्ल्यावरून पवना तलावाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.
विसापूर किल्ल्यावर एका खडकावर कोरलेली हनुमानाची अतिशय भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे.
लोणावळा रेल्वे स्थानकापासून सुमारे २४ किमी अंतरावर किल्ला वसलेला आहे. मुंबईहून तुम्ही पुणे रेल्वे प्रवास करा. त्यानंतर रिक्षा किंवा बसने विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.