Navi Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: आधी बेदम मारहाण नंतर डोक्यात दगड घातला, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर; भरचौकात हत्येचा थरार| VIDEO

Belapur Police: नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये हत्येची भयंकर घटना घडली. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. बेलापूरच्या शहाबाद गावात ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीचं डोकं दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस घटनास्थळावर आले तरी देखील आरोपी या व्यक्तीला मारहाण करत होता. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास बेलापूरमधील शहाबाद गावातील ब्रिजखाली ही घटना घडली. २८ वर्षीय तरुणाने ६० वर्षीय व्यक्तीची हत्या केली. प्रकाश लोखंडे असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने झोपेत असताना प्रकाश लोखंडे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लोखंडे यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकाला देखील आरोपीने बेदम मारहाण केली. यावेळी प्रकाश लोखंडेंच्या कुटुंबातील सदस्य देखील तिथेच होते. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने त्यांना जीवानिशी संपवलं.

या आरोपीला गावातीलच लोकांनी रंगेहात पकडत बेलापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. बेलापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT