police
policeSaam tv

Pune Crime: पुण्यात महसूल खात्यानंतर पोलिस विभाग 'लाचखोरीत' आघाडीवर! धक्कादायक आकडेवारी समोर

Shocking: पुणे विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसूल खात्यानंतर पोलिस विभाग लाचखोरीत सर्वाधिक आघाडीवर असल्याचे आकडेवारीतून समोर आली आहे.
Published on

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे विभागात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल खात्यानंतर पोलिस विभाग सर्वाधिक लाचखोर ठरत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत म्हणजेच १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरण नोंदवले गेले आहे. तर, भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचे समोर आले आहे. पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

police
Amravati: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं” वडिलांची परिस्थिती बिकट अन्.. दहावीत ९६ टक्के मिळवणाऱ्या तरूणीची आत्महत्या

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत महसूल विभागात सर्वाधिक ६ कारवाया, तर पोलिस विभागात ५ कारवाया केल्या गेल्या. याशिवाय जिल्हा परिषद, आरोग्य, महापालिका, वन, नगररचना, वस्तू सेवा कर आणि कृषी विभागातही लाचखोरीचे प्रकार उघड झाले आहेत.

कुठल्या विभागात अँटीकरप्शनची किती कारवाई

महसूल विभाग – 6 कारवाया

पोलिस विभाग – 5 कारवाया

जिल्हा परिषद – 3

आरोग्य विभाग – 2

महापालिका विभाग – 2

वन विभाग – 1

नगररचना विभाग – 1

वस्तू सेवा कर (GST) – 1

कृषी विभाग – 1

police
Shocking: फेसबुकवर ओळख अन् लग्नाचं प्रॉमिस, शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ शूट, १२ लाखांना गंडा; आरोपी अटकेत

या आकडेवारीवरून भ्रष्टाचाराचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः नागरिकांशी संबंधित असलेले महसूल आणि पोलिस विभाग लाचखोरीत आघाडीवर असल्यामुळे सामान्य जनतेच्या न्याय, हक्क आणि सेवांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com