
फेसबुकवर ओळख वाढवून ४२ वर्षीय मुंबईतील एका व्यक्तीने ४७ वर्षीय महिलेला अमली पदार्थ देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तिच्या भावाकडून १२ लाख रूपये उकळले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश कक्कड (वय ४२, रा. मुंबई) याने फेसबुकवरून पीडित महिलेसोबत ओळख वाढवली. सतत संवाद साधून तिचा विश्वास जिंकला. तसेच लग्न करण्याची भूलथाप दिली. २०२४ साली तो पीडितेच्या नागपूरच्या घरात गेला आणि तिच्यासोबत साखरपूडा केला. यानंतर त्याने महिलेच्या खाण्या-पिण्यात अमली पदार्थ टाकून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओही शूट केला.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तिच्या भावाकडून १२ लाख रूपये उकळले. तसेच एक रूपयेही परत केला नाही.
जेव्हा पीडित महिलेने याबाबत आवाज उठवला, तेव्हा कक्कडने तिचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली. यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच कक्कड विरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रकरण जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पहाटे पोलिसांनी पुण्यातील खडकी परिसरातून त्याला अटक केली आहे. तपासादरम्यान असे आढळले की, कल्पेश कक्कडवर हैदराबादमधील असाच गुन्हा दाखल असून, तो विविध शहरांमध्ये महिलांना टार्गेट करून शोषण करत होता. सध्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.