Navi Mumbai: नवी मुंबईत तयार होतोय नवा पूल, ठाणे-बेलापूर प्रवास सुसाट होणार, 25 कोटींचा ब्रिज, ट्रॅफिकपासून सुटका मिळणार!

Thane-Belapur Road New Bridge: नवी मुंबई महानगर पालिका ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैराने आणि घणसोलीमध्ये जाण्यासाठी आर्म ब्रिज बांधणार आहे. यामुळे ट्राफिक कोंडीची समस्या दूर होईल.
Navi Mumbai: नवी मुंबईत तयार होतोय नवा पूल, ठाणे-बेलापूर प्रवास सुसाट होणार, 25 कोटींचा ब्रिज, ट्रॅफिकपासून सुटका मिळणार!
Thane-Belapur Road Saam Tv
Published On

NMMC ने ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत पोहचण्यासाठी नवा पूल तयार करण्याचा प्लान तयार केला आहे. नवी मुंबई महानगर पालिका ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैराने आणि घणसोलीमध्ये जाण्यासाठी आर्म ब्रिज बांधणार आहे. या पूलासाठी तब्बल 24.23 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. हा प्रोजेक्ट नोड्सवर वाहतूक प्रवाह सुलभ करण्यात मदत करेल.

सध्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ फक्त एक अरुंद भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर वाहनधारक कोपरखैरणे नोडमध्ये जाण्यासाठी करतात आणि टीबी रोडवरील ठाण्याकडे जाणाऱ्या गल्लीतून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्ता आहे. नोडमधील रहिवाशांना ठाणे-बेलापूर रस्त्यावरून ये-जा करताना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी लांबपर्यंत चालत जावे लागते. महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचण्याचा सामनाही वाहनधारकांना करावा लागतो.

हा नवीन पूल तयार झाल्यानंतर वाहन चालकांना टीबी रोडवर बेलापूर ते ठाण्याच्या दिशेला जाताना नोटवरून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना मोठा दलासा मिळणार आहे. ते धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीसोबत (DAKC) टीबी रोडवरील उड्डाणपूलानंतर सुरू होणाऱ्या आर्म ब्रिजवरून जाऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ शकणार आहेत.

Navi Mumbai: नवी मुंबईत तयार होतोय नवा पूल, ठाणे-बेलापूर प्रवास सुसाट होणार, 25 कोटींचा ब्रिज, ट्रॅफिकपासून सुटका मिळणार!
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?

नवी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष अरदवाड यांनी सांगितले की, 'आम्ही एक आर्म ब्रिज बांधण्याची योजना आखली आहे. जी टीबी रोडवर ठाण्याकडे जाणाऱ्या लेनपासून सुरू होईल. ते कोपरखैरणे – महापे उड्डाणपुलाला जोडेल. जो टीबी रोडच्या वरून जातो आणि कोपरखैरणे आणि घणसोली नोड्स दरम्यान संपतो. कोपरखैरणे घणसोली (महापे वळण) ते टीबी रस्ता जोडणारा आरओबी आणि आर्म बांधण्यासाठी आम्ही निविदा मागवल्या आहेत. त्याचे सबमिशन महिना संपण्यापूर्वी कराव्या लागतात. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.'

Navi Mumbai: नवी मुंबईत तयार होतोय नवा पूल, ठाणे-बेलापूर प्रवास सुसाट होणार, 25 कोटींचा ब्रिज, ट्रॅफिकपासून सुटका मिळणार!
Mumbai University Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com