Mumbai University Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court on Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सुनावला आहे.
मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय
Mumbai University Senate ElectionSaam Tv
Published On

एक मोठी बातमी अमोर आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सुनावला आहे. 24 तास आधीच मुंबई विद्यापीठाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. तसेच या निवडणूक पुढे घेण्यात येतील, असे आदेश जारी केले होते.

मात्र याच आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी पार पडली. ज्यात उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दणका देत, निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश रद्द केले आहेत. तसेच ही निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश दिले आहेत.

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय
Nana Patekar: नाना पाटेकर विधानसभेच्या रिंगणात उतरणार, खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवणार? स्वतःच दिलं उत्तर

न्यायालयाने सरकारला झापलं

सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, तडका फडकी स्थगिती पत्र शासन कसं काढू शकतात? याबाबत ऑनलाईनही केवळ एकच पत्र कसं काय? दरम्यान, आता उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर २०२४ रोजी १० नोंदणीकृत जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २५ सप्टेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. 

या निवडणुकीत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्यानी सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पत्र लिहिलं होतं. यात सिनेट निवडणुकीत मतदान करताना तुम्ही भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घेण्याची आदित्य ठाकरे यांची सिनेट मतदारांना विनंती केली. २०१० मधील आमची पहिली निवडणूक झाल्यापासून, आम्ही तुमच्या सेवेसाठी, मुंबई विद्यापीठातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मनापासून वचनबद्ध राहिलो आहोत.

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागांच्यावर जाणार नाही, शरद पवार गटाचा दावा

ही निवडणूक २२ सप्टेंबर रोजी पार पडणार असून या निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि एबीव्हीपी थेट लढत होणार आहे. मागील २ निवडणुकांप्रमाणेच, यंदाही युवासेनेने सर्व १० उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी असून विद्यापीठ प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com