Crime News: रुग्णालयातील ICU वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार, गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्....

Rajasthan Crime News: राजस्थानच्या अलवरमध्ये रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गुंगीचे इंजेक्शन देत या रुग्णावर नर्सिंग स्टाफने बलात्कार केला.
Crime News: मध्यरात्री ICU मध्ये घुसला, महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं, नंतर बलात्कार करत...
Rajasthan Crime NewsSaam Tv
Published On

राजस्थानमधील एका रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये भरती असलेल्या महिला रुग्णावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलवर जिल्ह्यामधील ईएसआयसी मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही घटना घडली. ३२ वर्षीय महिलेवर ४ जुलैच्या रात्री नर्सिंग स्टाफने बलात्कार केला. महिला रुग्णाला गुंगीचे औषध देऊन आरोपीने रुग्णालयात हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईएसआईसी मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. या रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये ३२ वर्षीय महिलेवर उपचार सुरू होत. ४ जून रोजी एका नर्सिंग स्टाफने या महिला रुग्णावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेला गुंगीचे इंजेक्शन दिले होते आणि तिच्या बेडभोवती पडदे लावून हे कृत्य केले. सकाळी पीडितेच्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळाली तर त्याने मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली तेव्हा प्रशासनाने संपूर्ण प्रकरण दाबण्यास सुरुवात केली.

Crime News: मध्यरात्री ICU मध्ये घुसला, महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं, नंतर बलात्कार करत...
Crime News: बॉयफ्रेंडशी फोनवर बोलताना पकडलं, संतापलेल्या भावाने हात पकडले अन् आईने गळा दाबला; शिर धडावेगळं केलं

मेडिकल कॉलेज प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पीडितेने एडीएम सिटीला या प्रकरणाची माहिती दिली. एडीएम सिटीने तात्काळ एमआयए पोलिस स्टेशनला या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. कलम १६४ अंतर्गत महिलेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Crime News: मध्यरात्री ICU मध्ये घुसला, महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं, नंतर बलात्कार करत...
Kolhapur Crime : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कांड, कोल्हापुरातल्या समीक्षा हत्याकाडांत मोठी माहिती; आरोपीचा मित्राला फोन अन्...

पोलिसांनी सांगितले की, पीडितेचा व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटले आहे की रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितले की, आरोपीने प्रथम तिला गुंगीचे इंजेक्शन दिले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर आरोपीने बलात्कार केला. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. तसेच आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

Crime News: मध्यरात्री ICU मध्ये घुसला, महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं, नंतर बलात्कार करत...
Beed Crime: शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; घटनेत भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग, आरोपीला राजकीय पाठबळ|VIDEO

मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. असीम दास म्हणाले की, या प्रकरणाची माहिती मिळताच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. ते पथक शनिवारपर्यंत आपला अहवाल सादर करेल. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन डीनने दिले. या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Crime News: मध्यरात्री ICU मध्ये घुसला, महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं, नंतर बलात्कार करत...
Jharkhand Crime News:धाकट्या बहिणीसमोर पीडिता बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार; धक्कादायक घटनेनं झारखंड हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com