Maharashtra Budget 2024 Announcement: ठाण्यातील अंबरनाथसह ११ जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2024 Major Announcement For Medical College In 11 Districts: अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना अजित पववार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. तर ८ जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत.
Maharashtra Budget 2024 Announcement For Medical College In 11 Districts (including Thane and Amabarnath Colleges)
Maharashtra Budget 2024 Announcement For Medical College In 11 Districts (including Thane and Amabarnath Colleges)Saam Tv
Published On

Big Announcement On Maharashtra Budget 2024:

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याविषयी घोषणा केली. राज्यातील ११ जिल्ह्यात १०० विद्यार्थी प्रवेश करू शकतील असे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.(Latest News)

Maharashtra Budget 2024 Announcement For Medical College In 11 Districts (including Thane and Amabarnath Colleges)
Maharashtra Budget 2024 Highlights: अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

या जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संलग्नित ४३० खाटा असतील. या वैद्यकीय महाविद्यालयांसह जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालय (Govt Nursing College) सुरू केले जाणार आहेत. या महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेश करू शकणार असल्याची घोषणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प (Budget)मांडताना केली.

अजित पवार यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील घटकांना उद्देशून अंतरिम अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.

इतर महत्त्वाच्या घोषणा

  • मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

  • युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी.

  • स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

  • विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी

  • पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटी

  • जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये

  • सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये

  • सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे

  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती

  • कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरू

  • फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग

  • जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग

Maharashtra Budget 2024 Announcement For Medical College In 11 Districts (including Thane and Amabarnath Colleges)
Maharashtra Budget 2024: कॉन्ट्रॅक्टर जोमात, शेतकरी कोमात... अर्थसंकल्पावरुन उद्धव ठाकरेंची खोचक टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com