गिरीश कांबळे, मुंबई|ता. २७ फेब्रुवारी २०२४
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या घोषणा झाल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. टेंडर मिळणारे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात. पहिल्या ज्या घोषणा होत्या त्याचं झालं. नवीन काहीतरी बोलायचं. मृगजळाच्या पाठी धावायला लावायचे. मराठी भाषेबद्दल काहीच नाही. मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले त्याच काय झालं. त्याची गॅरंटी कोण घेणार?" असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.
आम्ही जरांगेंच्या पाठीशी असं समजा पण...
"आम्ही जरांगे पाटील यांच्या (Manoj jarange Patil) मागे आहोत असं समजू पण त्यांचं काय चुकलं ते तरी सांगा. जरांगे पाटील यांची मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात? आम्ही त्यांच्या मागे आहोत तर गुलाल कोणी उधळला?? जर SIT नेमली असेल तर चिवटपणाने चौकशी करा, असे म्हणत पोलीस महासंचालक हुश्शार आहेत. त्यांच्याकडे जरांगे यांना कोणाचे कॉल येत होते याची यादी असेल, " असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जयंत पाटीलांचे टीकास्त्र
"निर्मला सीतारामन यांनी काही मर्यादा पाळल्या आणि अंतरिम बजेटमध्ये आहे त्याच गोष्टी कायम ठेवल्या. राज्यातील अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना मागे पाडले. ९ हजार कोटींचे डेफिसिट बजेट मांडले. १ लाख कोटी वजा या सरकारकडे होते नवीन बजेट मांडताना महसुली तुटीचे बजेट मांडले. राज्य सरकारने फक्त निवडणुकीकडे पाहून लोकांना काहीतरी देणार आहोत म्हणून अशा घोषणा केल्या आहेत. इंटरिम बजेट हे नार्मल असते पण त्यापुढे जाऊन घोषणा केल्या आहेत," असे जयंत पाटील म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.