Delhi News: २६ वर्षीय तरूणानं गिळली ३९ नाणी आणि ३७ चुंबक, सगळ्यांनाच चक्रावून टाकणारं कारण आलं समोर

Delhi Shocking News: दिल्लीतील एका २६ वर्षीय तरुणाच्या शरीरात तब्बल ३९ नाणी आणि ३७ चुंबक सापडले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन ही नाणी बाहेर काढली आहेत.
Hospital
HospitalSaam tv
Published On

Delhi Boy Eat Coins And Magnet to Build His Body:

दिल्लीतील एका २६ वर्षीय तरुणाच्या शरीरात तब्बल ३९ नाणी आणि ३७ चुंबक सापडले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन नाणी बाहेर काढली आहेत. बॉडी बनवण्यासाठी जस्त हो फायदेशीर असते, असे त्याला सांगितले होते. त्यामुळे त्याने नाणी गिळली. या रुग्णाला आठवडाभर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. यानंतर आता त्याच्या आतड्यामधून नाणी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. (Latest News)

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात या रुग्णावर उपचार होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे. या तरुणाच्या आतड्यातून तब्बल १, २ आणि ५ रुपयांची ३९ नाणी आणि ३७ चुंबक काढण्यात आले आहे. हे चुंबक गोल, त्रिकोणी, तारा अशा आकारांमध्ये होते. रुग्णाने याबाबत माहिती दिली आहे. नाण्यांमध्ये असलेल्या जस्तने त्याची बॉडी बनण्यास मदत होईल. त्यामुळे त्याने ही नाणी खालली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या तब्बल २० दिवसांपेक्षा जास्त वेळ उलट्या आणि ओटीपोटात दुखत होते. त्यामुळे त्याला इमरजन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्याला काहीच खाता येत नव्हते. तो मागील २०-२२ दिवस नाणी खात असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याचा सीटीस्कॅन करण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात नाणी असल्याचे समजले.

Hospital
Ghaziabad News : हृदयविकाराच्या झटक्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरहानं पत्नीनं मृत्यूला कवटाळलं

तरुणावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या आतड्यात चुंबक आणि नाणी असल्याचे दिसले. यामुळेच त्याच्या पोटात दुखत होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.शस्त्रक्रियेत त्याच्या आतड्यातून यशस्वीरित्या नाणी आणि चुंबक काढण्यात आले आहे.

Hospital
Gaganyaan Mission : 'गगनयान' मोहिमेवर जाणार ४ अंतराळवीर; स्वतः PM मोदींनीच जाहीर केली नावं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com