
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ऑनर किलिंगची हादरवून टाकणारी घटना घडली. बॉयफ्रेंडशी फोनवर गप्पा मारत असलेल्या मुलीला आईने पकडले. यावरून मुलगी आणि आईमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. यावेळी तिने मुलाची मदत घेतली. मुलीची हत्या केल्यानंतर याची माहिती महिलेने आपल्या भावांना दिली. त्यानंतर हे सर्वजण महिलेच्या घरी आले. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिर आणि धड वेगळे केले. त्यानंतर परतापूर येथील बहादरपूरमध्ये तिचा मृतदहे फेकून देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आस्था उर्फ तनिष्का असं हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. बुधवारी दुपारी आस्था आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. आस्थाच्या आईने तिला फोनवर बोलताना पाहिले आणि ती संतापली. तिने आस्थाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. यावरून आस्था आणि तिच्या आईमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आस्थाच्या आईने आणि भावाने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आस्थाच्या आईने भावांना फोन करून घटनेची माहिती दिली. ते तात्काळ कार करून आस्थाच्या घरी आले.
आस्थाच्या आईचे मामे भाऊ, दोन मामा आणि मावस भाऊ यांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यचा प्लान केला. ठरल्याप्रमाणे या सर्वांनी आस्थाचं शिर आणि धड वेगळं केलं. त्यानंतर आरोपींनी आस्थाचे धड नाल्यात फेकले आणि शिर बहादरपूर कालव्यात फेकून ते निघून गेले. आस्थासोबत नेमकं काय झालं हे कुणालाच माहिती नव्हते.
पोलिसांना कालव्यात मृतदेह आढळून आला. हा मृतदेह तरुणीचा होता. या तरुणीच्या पँटच्या खिशामध्ये मोबाईल होता. या मोबाईलमधील शेवटच्या नंबरवरून पोलिसांनी कॉल केला तेव्हा हा मृतदेह आस्थाचा असल्याचे समोर आले. आस्थाचे धड सापडले पण तिचे शिर अद्याप सापडले नाही. त्यानंतर आस्थाची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला. आस्थाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.