
मेघालय : मेघालयात हनिमूनसाठी गेलेले इंदूर येथील नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनं भयानक वळण घेतलं आहे. मेघालय पोलिसांनी राजाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची पुष्टी केली आहे आणि २ जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा (चेरापुंजी) येथील धबधब्याजवळील एका खोल दरीतून मृतदेह सापडला आहे. सोनमचा शोध अजूनही सुरू आहे आणि कुटुंबाने या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) याला खुनाचा स्पष्ट खटला म्हटलं आहे.
मंगळवारी, पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सीम यांनी माध्यमांना सांगितले की, 'आम्ही पीडितेचा मोबाईल फोन आणि हत्येत वापरलेलं हत्यार जप्त केलं आहे. ते एक नवीन हत्यार होतं. फक्त या गुन्ह्यासाठी वापरला गेला होता. हा खून होता यात शंका नाही. ज्या ठिकाणी शस्त्र आणि फोन सापडला त्या परिसरात मृतदेह आढळून आला, त्यामुळे हा गुन्हा परिसरात घडल्याचे दिसून येते.' या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
राजा आणि सोनम यांचं लग्न ११ मे रोजी इंदूरमध्ये झालं. ते २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे २२ मे रोजी भाड्याने घेतलेल्या स्कूटरने मावलाखियात गावात पोहोचले आणि तेथून ३,००० पायऱ्या उतरून नोंगरियात गावात पोहोचले आणि तेथून ३,००० पायऱ्या उतरून नोंगरियात गावातील प्रसिद्ध 'लिव्हिंग रूट ब्रिज' पाहण्यासाठी गेले.
ते एका होमस्टेमध्ये रात्रभर राहिले आणि २३ मे रोजी सकाळी निघून गेले. काही तासांनंतर ते बेपत्ता झाले. २४ मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावरील एका कॅफेजवळ त्यांची स्कूटर सोडून दिलेली आढळली, त्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला.
सोमवारी, ११ दिवसांनंतर, ड्रोनच्या मदतीने, राजा यांचा मृतदेह नोंग्रिअट गावापासून २० किमी अंतरावर असलेल्या वेई सोडोंग धबधब्याजवळ १०० फूट खोल दरीत आढळला. विवेक सीम म्हणाले की, राजाच्या उजव्या हातावरील 'राजा' टॅटू आणि त्याच्या मनगटावरील वॉटरप्रूफ स्मार्टवॉचवरून मृतदेहाची ओळख पटली. घटनास्थळावरून एका महिलेचा पांढरा शर्ट, पेंट्रा ४० औषधाची पट्टी, तुटलेला मोबाईल फोन एलसीडी स्क्रीन आणि स्मार्टवॉच जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.