Crime : आधी मारहाण, मग कपडे काढायला लावले; न्यूड व्हिडीओ बनवून धमकावलं, महिलेला मैत्रिणीनेच दिला धोका

Haryana Crime: दांपत्याला फसवून घरातील एका खोलीत बंद करण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली, जबरदस्ती करुन कपडे काढण्यास भाग पाडले. त्या अवस्थेत व्हिडीओ काढून दांपत्याला धमकावण्यात आले.
Haryana Crime
Haryana Crimex
Published On

Shocking News : एका दांपत्याला चार-पाच तरुणांनी मारहाण केली आणि त्यांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर आरोपीने पती-पत्नी दोघांना कपडे काढायला भाग पाडले. नग्न अवस्थेत दांपत्याचे व्हिडीओ बनवण्यात आले. त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या पलवलमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अडीच वर्षांपूर्वी वर्षा नावाच्या एका महिलेसोबत काम करत होती. कामाच्या निमित्ताने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. जानेवारी महिन्यामध्ये वर्षाने पीडित महिलेकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. ३ मे रोजी जेव्हा पीडित महिला वर्षाच्या घरी पैसे परत घेण्यासाठी गेली, तेव्हा वर्षाने माझ्या आईला डिस्कचा आजार असल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली.

Haryana Crime
Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

३१ मे रोजी वर्षाने पीडित महिलेला फोन केला. दुसऱ्या दिवशी वर्षी तिच्या आईसोबत माहेरी पोहोचली. तिने पीडित महिला आणि तिच्या नवऱ्याला देखील तेथे बोलावले होते. जेव्हा पती-पत्नी वर्षाच्या घरी पोहोचले, तेव्हा चार-पाच तरुणांनी त्या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दांपत्याला घरातील एका खोलीत बंद केले.

Haryana Crime
Team India साठी दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांनी दांपत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांना कपडे काढण्यास भाग पाडले. त्यांनी दोघांचे नग्न अवस्थेत व्हिडीओ बनवले. हे नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील मारेकऱ्यांनी दांपत्याला दिली. या बदल्यात मारेकऱ्यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली. या सर्व कारस्थानामागे पीडितेची मैत्रीण वर्षा असल्याचे म्हटले जात आहे.

Haryana Crime
आता Caste Certificate एका क्लिकवर मिळणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com