Team India साठी दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Piyush Chawla Retires : भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
Team India
Team Indiax
Published On

Team India चा फिरकीपटू गोलंदाज पियूष चावलाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. पियूष चावला दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता. २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर त्याने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याने भारताकडून ३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, यात त्याने ४३ विकेट्स घेतल्या.

२००७ मध्ये जेव्हा महेंद्रसिंह धोनीने पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता, तेव्हाच्या भारतीय संघामध्ये पियुष चावलाचा समावेश होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघात देखील चावलाचा समावेश होता. पियुष चावला १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता. २०१२ मध्ये त्याने शेवटचे भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Team India
भारतासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर, शुभमन गिलचं टेंशन हलकं झालं

९ मार्च २००६ रोजी मोहाली येथे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात पियुष चावलाने पदार्पण केले होते. १२ मे २००७ रोजी बांगलादेशविरुद्धच्या खेळताना त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टी-२० सामने खेळण्यासाठी पियुष चावलाला काही वेळ वाट पाहावी लागली. २ मे २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले.

Team India
Bengaluru Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी पहिली अटक, RCB च्या सदस्याला विमानतळावर बेड्या

पियुष चावलाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतासाठी ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३२ विकेट्स घेतल्या. पियुष चावला ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एकूण कारकीर्दीत पियुष चावलाने २९७ टी-२० सामन्यांमध्ये ३१९ विकेट्स घेतल्या आहेत.

Team India
विराट कोहलीच्या RCB वर मोठी कारवाई, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com