Shocking : उसने दिलेले पैसे परत मागितले, बॉयफ्रेंडची सटकली; गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह सूटकेसमध्ये भरला, अन्...

Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला. तब्बल १०० किमी लांब एका ठिकाणी आरोपीने मृतदेह असलेला सूटकेस फेकला.
Shocking news.
Shocking news.x
Published On

उत्तरप्रदेशच्या हापुडमध्ये एका तरुणीचा मृतदेह सूटकेसमध्ये सापडला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. मृत तरुणीची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. उत्तरप्रदेशमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे कनेक्शन राजधानी दिल्लीशी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मयूर विहार येथील रहिवासी असणाऱ्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. तिचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवला आणि हापुडच्या पिलखुवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिखेरा कालव्यात फेकून दिला. या प्रकरणातील आरोपीचे नाव सतेंद्र यादव असे आहे. त्यांच्याकडून मृत तरुणीचा फोन, तिचे सामान आणि हत्येदरम्यान वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. हे दोघे दिल्लीतल्या मयूर विहारचे रहिवासी होते. सध्या आरोपी सतेंद्र पोलिसांच्या ताब्यात आहे.

Shocking news.
Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांसमोर अनेक गोष्टींची कबुली दिली. मृत तरुणी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. तरुणीने आरोपीला तिच्या कुटुंबियांशी ओळख देखील करवून दिली होती. आरोपी काही कामानिमित्ताने पटियाला येथे गेला होता. दिल्लीला परतल्यानंतर त्याला तरुणीच्या वागण्यावर संशय आला. तिचा फोन नेहमी व्यस्त लागत असल्याने आरोपीच्या मनातील संशय वाढत गेला. या संशयापायी त्याने तरुणीची निर्घृण हत्या केली.

Shocking news.
Crime : आधी मारहाण, मग कपडे काढायला लावले; न्यूड व्हिडीओ बनवून धमकावलं, महिलेला मैत्रिणीनेच दिला धोका

आरोपी सतेंद्रने तरुणीकडून ५ लाख रुपये उधार घेतले होते. त्या पैश्यांतून आरोपीने कार खरेदी केली होती. तरुणीने सतेंद्रकडे २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याने सतेंद्र चिडला. पैसे मागितल्याचा राग आणि चारित्र्यावरील संशय यामुळे आरोपीने दुपट्ट्याने तरुणीचा गळा दाबला. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि १०० किमी लांब हापुर येथे तो सूटकेस एका कालव्यात फेकून दिला.

Shocking news.
Team India साठी दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com