योगेश काशीद, साम टीव्ही
बीड: येथीलअंबाजोगाईच्या शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली असून या प्रकरणातील पाचवा आरोपी हा भाजपचा पदाधिकारी आहे. संदीप काचगुंडे असं त्याचं नाव असून तो भाजपाचा धारूरचा तालुकाध्यक्ष आहे. संदीप काचगुंडे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी दोन पथक रवाना करण्यात आले असून अंबाजोगाई तालुक्यातील गीता येथील विवाहित महिला शुभांगी शिंदे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती, आणि या प्रकरणी आरोपी पती सहसासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली. मात्र, यातील पाचवा आरोपी संदीप काचगुंडे हा भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष आहे. तो मात्र फरार असून त्याला फरार होण्यात राजकीय पाठबळ मिळाला आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले आहे. तर भाजपाचा पदाधिकारी संदीप काचकुंडे याला अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती बर्दापूर पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणांमध्ये पती संतोष शिंदे सासरे विलास शिंदे सासू सुमन शिंदे ननंद सीमा शिंदे आणि पती मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात भाऊ प्रदीप सोळंके यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.