Mumbai Solapur Vande Bharat Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Solapur Vande Bharat: मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस किती वाजता सुटते? ठाणे, पुण्यासह या स्टेशनवर थांबा; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Solapur Vande Bharat Express Timings, Route and Halt: मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. या ट्रेनचे वेळापत्रक, थांबा याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Siddhi Hande

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाह

दादर, ठाणे, पुण्यात आहे थांबा

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक वाचा

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास खूप सोपा आणि जलद झाला आहे.देशभरात अनेक ठिकाणांहून वंदे भारत एक्सप्रेस धावते. मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागच्या तीन वर्षात जवळपास २३ लाख प्रवाशांना प्रवास केला आहे.

वंदे भारत एक्सप्रेस पुण्यात थांबते. यामध्ये सर्वाधिक प्रवासी मुंबई-पुणे मुंबई प्रवास करतात. यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ९ फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरु झाली होती.यामुळे ट्रेनची प्रवासीसंख्या वाढत आहे, वेळेची बचत होत आहे. त्यामुळे खूप फायदा झाला आहे.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई ते सोलापूर हे अंतर ४५५ किलोमीटर आहे. हे अंतर फक्त ६ तास ३० मिनिटांत पूर्ण होते. इतर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या तुलनेत वंदे भारतमुळे दीड तासांचा वेळ वाचतो. याचसोबत ही ट्रेन अनेक ठिकाणी थांबते. यामुळे या ठिकाणचेही प्रवासी प्रवास करतात. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे, दादर असे थांबे या ट्रेनला आहे. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावते.

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्र (Mumbai-Solapur Vande Bharat Express Timetable)

मुंबई ते सोलापूर (ट्रेन क्र. 22225) (CSMT to Solapur Vande Bharat Express)

ट्रेन दुपारी ४.०५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणार आहे. ही ट्रेन रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही ट्रेन सकाळी ९.१५ मिनिटांनी पुण्याला पोहचते. तिथून अडीच तासात ट्रेन पुढे मुंबईला पोहचते.

सोलापूर ते मुंबई (ट्रेन क्र. 22226) (Solapur to CSMT Vande Bharat)

वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.०५ मिनिटांनी सोलापूर येथून निघणार आहे. ही ट्रेन दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहचणार आहे. या गाडीला पुण्यात थांबा आहे. ७.१० मिनिटांनी ही ट्रेन पुण्यात पोहचते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT