Manasvi Choudhary
तोंडली भाजी खायला अनेकजण नाक मुरडतात. पण तोंडलीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तोंडलीची रस्सा भाजी तुम्ही बनवली तर चविष्ट लागते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही तोंडलीची भाजी बनवा.
घरगुती स्टाईल तोंडलीची रस्सा भाजी बनवण्याची रेसिपी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
तोंडलीची भाजी बनवण्यासाठी तोंडली, कांदा, कोथिंबीर, मसाला, हळद, मीठ, धनापावडर, आलं- लसूण पेस्ट आणि चणाडाळ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी तोंडली स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर तोंडली उभ्या आकारात बारीक चिरून घ्या गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तोंडली परतून घ्या आणि प्लेटमध्ये काढा.
कढईत गरम तेलात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चणाडाळ मिक्स करून शिजवून घ्या. मिश्रण शिजले की त्यात मसाला, हळद आणि मीठ मिक्स करा.
साधारण १० ते १५ मिनिटे झाकण ठेवा म्हणजे तयार भाजी तयार होईल. त्यानंतर मिश्रणात एक ग्लास पाणी टाका आणि भाजी चांगली शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी तोंडलीची रस्सा भाजी तयार होईल.