Sakshi Sunil Jadhav
१४ फेब्रुवारी हा दिवस सगळ्याच कपल्ससाठी महत्वाचा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.
तुम्ही या दिवशी जोडीदाराला सुंदर तिचे मन रमेल अशा शांत ठिकाणी घेऊन जाऊ शकता. पुढे नाशिकजवळील ठिकाणांची यादी दिली गेली आहे.
१४ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला त्र्यंबकेश्वर मंदिराचे दृश्य दाखवू शकता.
सुला व्हाइनयार्डस हे ठिकाण डोंगराळभागात वसेलेले आहे. तिथे तुम्हाला द्राक्षाच्या बागा पाहायला मिळतील. हे दृश्य नक्कीच तुम्ही पाहिले नसेल.
तुम्ही १४ फेब्रुवारीला सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात पत्नीसोबत जाऊन तिथले सुंदर दृश्य पाहू शकता. ज्या महिलांना देवस्थानाजवळ फिरायला आवडतं, त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
तुम्हाला जर ऐतिहासिक ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही पांडव लेणी पाहायला नक्कीच जा. तिथे शांत वातावरणात नक्कीच तुमचे मन रमेल.
सोमेश्वर मंदिर हे गोदावरीच्या काठावर वसलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तिथे सुंदर पाण्याचा आणि शांत वातावरणा अनुभव घेता येईल.
अंजनेरी टेकडी ही डोंगराळ भागात उंचावर आहे. हे ठिकाण कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट आहे. जे नाशिकपासून फक्त २० किमी अंतरावर वसलेलं आहे.